270 लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण
पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील ऊस गाळप हंगामाने आता जोर पकडला असून सद्यस्थितीत आतापर्यंत सुमारे 270 लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे, तर 8.05 टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार 21 लाख 75 हजार टनाइतके साखर उत्पादन हाती आले आहे. गतवर्ष
sugar


पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील ऊस गाळप हंगामाने आता जोर पकडला असून सद्यस्थितीत आतापर्यंत सुमारे 270 लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे, तर 8.05 टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार 21 लाख 75 हजार टनाइतके साखर उत्पादन हाती आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे दुप्पट गाळप झाल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद आहे. राज्यातील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. मात्र, दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे पहिला पंधरवडा जेमतेम कारखान्यांकडूनच ऊस गाळप सुरू राहिले. परंतु आता ऊस गाळप हंगामाने चांगलाच वेग पकडला आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात ऊस गाळप हंगामाचे सुयोग्य नियोजन केले. त्यामुळेच राज्यात आतापर्यंत 102 खासगी व 101 सहकारी साखर कारखान्यांना ऑनलाईनद्वारे ऊस गाळप परवाने वितरित केले आहेत. सद्यस्थितीत ऊस गाळप परवान्यासाठी शासनाने निश्चित केलेली रक्कम न भरणे, अपूर्ण प्रस्ताव व अन्य मुद्द्‌‍यांमुळे केवळ 10 कारखान्यांना गाळप परवाने देणे बाकी आहे. तेसुद्धा पुढील आठवड्यात देण्यास आमचे प्राधान्य असेल, असे साखर सहसंचालक महेश झेंडे यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande