
नांदेड, 7 डिसेंबर, (हिं.स.)।
हिमायतनगर तालुक्यातील वडगाव
तांडा येथे एक शेतकरी आपल्या शेतात बैल सोडत असताना पाठीमागुन बिबट्यानं अचानक हल्ला केला. मात्र त्याचवेळी बैल उधळल्याने बिबट्याच्या तोंडात केवळ शेतकऱ्याचे कपडेच अडकल्याने शेतकरी बालंबाल बचावला.
वडगाव तांडा येथील शेतकरी उल्हास राठोड हे आपल्या शेतात बैलाला सोडत असताना अचानक एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. मात्र
त्याच वेळी बैल उधळल्याने बिबट्याच्या तोंडात उल्हास राठोड यांच्या अंगावरील कपडेच अडकल्याने फाटले आहेत. शेतकरी राठोड यांनी आरडा-ओरड केल्याने व बैल उधळल्याने सदर बिबट्याने इस्लापुरच्या दिशेने धाव घेतल्याचे प्रत्यक्ष दर्शनीने सांगीतले.
मागील पंधरवड्यात सवना, रमणवाडी, एकघरी, पार्टी ज. शिवारासह सिध्देश्वर मंदिर परिसरातील शेतात दोन बिबटे, दोन पिल्ले फिरत असल्यामुळे शेतात कापूस वेचणी करणाऱ्या महिलांसह रात्रीला पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभाग पथकाच्या पाहणीत सदर बिबट्याच्या पाऊल खुणा शिवारात दिसुन आल्याचे सांगितले जाते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis