रत्नागिरी : जानशीच्या साने गुरुजी विद्यामंदिरात हवामान मोजमाप यंत्र प्रदान
रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) : जानशी (ता. राजापूर) येथील साने गुरुजी विद्यामंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत पुणे येथील दानशूर हेमंत गोखले यांच्या देणगी स्वरूपात हवामान मोजमाप यंत्र प्रदान करण्यात आले. हे अत
जानशीच्या साने गुरुजी विद्यामंदिरात हवामान मोजमाप यंत्र प्रदान


रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) : जानशी (ता. राजापूर) येथील साने गुरुजी विद्यामंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत पुणे येथील दानशूर हेमंत गोखले यांच्या देणगी स्वरूपात हवामान मोजमाप यंत्र प्रदान करण्यात आले.

हे अत्याधुनिक यंत्र हायस्कूलच्या आवारात बसविण्यात आले असून तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान, वायुदाब अशा विविध हवामान निर्देशांकांचे अचूक मोजमाप करण्याची क्षमता या उपकरणात आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीने हवामानशास्त्र समजण्यासाठी आणि स्थानिक हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील हे पहिले हवामान मोजमाप यंत्र असून राज्य सरकारकडून अशा प्रकारची उपकरणे विविध ग्रामपंचायतींच्या आवारात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील हेमंत गोखले यांच्या माध्यमातून हे यंत्र शाळेला मिळावे यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी हर्षद तुळपुळें यांनी विशेष प्रयत्न केल्याचे आयोजकांनी नमूद केले. हेमंत गोखले दांपत्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधत मिठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघातील अनेक सदस्यांना नाटे येथील सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने मिशन प्रतिसाद अंतर्गत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मिठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, पुणे येथील हेमंत गोखले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, रमेश राणे, बलवंत सुतार, अमर आडिवरेकर, पूनम मयेकर, मुख्याध्यापक प्रसाद शिवणेकर, सौ. स्नेहल सुतार, पत्रकार राजन लाड, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी गावकर, मधुकर पावसकर, आनंदा मोरे, विजय मोरये, संतोष मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande