
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ४ मधील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपातर्फे आयोजित “जनसंवाद बैठक” पार पडली.या जनसंवादात आमदार विजय देशमुख यांनी प्रभागातील नागरिक, व्यापारी, डॉक्टर, विधीज्ञ यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “प्रत्येक प्रभागात दर दोन महिन्यांनी जनसंवाद बैठक घेऊन लोकांच्या अडचणींचे त्वरित निवारण करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.प्रभाग ४ हा सोलापूर शहरातील प्रमुख कापड मार्केट, सराफ मार्केट, भुसार मार्केट आणि जुनी बाजारपेठ असलेला भाग आहे. येथे स्वतंत्र वाहनतळ नसल्याने नेहमी ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते.नागरिकांनी अद्ययावत वाहनतळाची मागणी केल्यानंतर “मनपा व वाहतूक विभागासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा सोडवू,” असे देशमुखांनी आश्वासन दिले.
बैठकीस माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, महेश तापडिया, देविदास चेळेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, भाजयुमो प्रदेश सचिव गणेश साखरे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड