
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
गहाणमुक्तीचा दस्त नोंदविणेबाबत बँकेशी विचारणा करणे, एनओसी घेणे आवश्यक आणि क्रमप्राप्त असताना अप्रामाणिकपणे जमिनीची विक्री करुन बँकेचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांसह दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रंगा भीमा मोरे,परशुराम भीमा मोरे,यल्लाप्पा भीमा मोरे, लक्ष्मीबाई भीमा गायकवाड,मेल्लूबाई भीमा गायकवाड(सर्व रा. परांडा रोड,बार्शी),महंमद इम्रान जहांगीर काझी(रा.नाईकवाडी प्लॉट,बार्शी),रिझवान जहांगिर काझी(रा.शीतल पेट्रोलपंपाशेजारी,कोंढवा पुणे),कुंडलिक यशवंत शेंडगे(रा.शेंडगे प्लॉट,उपळाई रोड,बार्शी),कुमार विठ्ठल नागणे(रा.हेडेगल्ली, बार्शी)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक दगडू लांबतुरे(वय ५४)यांनी फिर्याद दिली ही घटना २३ नोव्हेंबर २०१६ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड