लातूरातील अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। शहरासह अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जमाअते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अल्पसंख्यांक मुलांचे वस्तीगृह आ
शहरासह अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जमाअते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


लातूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।

शहरासह अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जमाअते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अल्पसंख्यांक मुलांचे वस्तीगृह आणि उर्दू घर ची पूर्तता, लातूर जिल्हा रूग्णालय, लातूर शहरात वाढत असलेला वाहतुकीचा मुद्दा, गंजगोलाईमधील १६२ टपररीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन, जन्म नोंदणी प्रक्रिया व जन्मदाखल्याबद्दल समस्या, अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या नियमित बैठका आणि लातूरमधील बदलती धार्मिक, सामाजिक परिस्थिती व बांधिलकी या ७ मुद्द्यांना सोडविण्यासाठी जमाअते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेट देऊन या समस्यावर चर्चा करण्यात आली आणि निवेदन देण्यात आले.

यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष इकराम शेख, शहराध्यक्ष रफिक शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, फैसलखान कायमखानी, रजाउल्लाह खान, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, शकील शेख, रईस टाके, माजी नगरसेवक अहेमदखाँ पठाण, अय्युब मणियार, अजीज बागवान, युनूस मोमीन, खदीर खान आणि एस आय ओ चे शहराध्यक्ष जुनेद शेख आदींसह अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक वसतीगृहाचा मुद्दा बऱ्याच वर्षापासून रखडला आहे. या हॉस्टेलमुळे बऱ्याच अल्पसंख्यांक मुलांचा फायदा होऊ शकतो. रक्कम मंजूर होऊनही सुरू न झालेल्या या कामाला आपण व्यक्तीश: लक्ष दिल्यास गती प्राप्त होईल. तसेच लातूर शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या मुला व मूर्तीच्या शैक्षणिक चळवळीसाठी उर्दू घर शैक्षणिक संकुलाची उभारणा लवकरात लवकर करण्यात यावी.

लातूरला एक सरकारी मेडिकल कॉलेज, एक सुपर स्पेशलिटी रुग्णालय व एक महिला व बाल रुग्णालय देखील प्रस्थापित झाले. परंतु लातूरच्या हक्काचे जिल्हा रुग्णालय हे अजूनही झालेले नाही. जिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध झालेली आहे जागेचे हस्तांतरण झालेले आहे. तरी लवकरात लवकर जिल्हा रुग्णालय प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आपण करावेत.

लातूर शहरांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सध्याचे असलेले रस्ते अपुरे पडत आहेत व हीच समस्या पुढे खूप प्रकर्षाने लातूरला भेडसावणार आहे. त्यासाठी आजपासूनच नवीन रस्ते, असणाऱ्या रस्त्यांची व्यवस्थित निगा राखणे, तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणाची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

गंज गोलाईमधील १६२ टपरीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत आपल्या लातूर शहरातील गंज गोलाई परिसरात अनेक वर्षांपासून 162 टपरीधारक नागरिक भाडे तत्वावर व्यवसाय करत होते. सन २००९ मध्ये शहराच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने त्यांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. परंतु, आजपर्यंत या टपरीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नाही. परिणामी, ते सर्वजण आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. याप्रकरणी लक्ष घालून टपरीधारकांचे लवकरात लवकर व न्याय्य असे पुनर्वसन व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत.

लातूरमध्ये सध्या भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी विनाकारण ढवळाढवळ सुरू ठेवली आहे. बांग्लादेशी आहेत म्हणून लातूर मधील मुस्लिम समाजातील व्यक्तींचा छळ केला जात आहे. जन्मदाखले, जे कदाचित येणाऱ्या काळामध्ये नागरिकतेसाठी खूप महत्त्वाचे ठरतील, त्याला घेऊन मुस्लिम समाजाला लक्ष केले जात आहे. जवळपास अडीच हजार लोकांना नोटीस दिली गेली आहे. अशा लोकांना न्याय द्यावा व यापुढे अशा अन्यायवादी मानसिकतेच्या लोकांना लातूरमध्ये ढवळाढवळ करू देऊ नये.

लातूर शहर व जिल्ह्यात अल्पसंख्याक योजनेअंतर्गत व पंचवार्षिक १५ कलमी कार्यक्रमांतर्गत व सच्चर समितीच्या मंजूर शिफारशींचे परिणामकारक अंमलबजावणीसाठी शासन निर्णय क्र. 15/04/2017 च्या सूचनेप्रमाणे अल्पसंख्याक कल्याण समितीच्या नियमित बैठका घेण्याकरीता आयोजनासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. बैठकाच न झाल्यामुळे अल्पसंख्याकांच्या कल्याणाची कुठलीच कामे होत नाहीत.

वरीलपैकी बऱ्याचश्या प्रश्नांसाठी व येणाऱ्या काळात अजून गंभीरपणे उद्भवणाऱ्या प्रश्नांसाठी लातूरमध्ये धार्मिक व सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.या सर्व मुद्यांवर चर्चेसाठी, तसेच याची अंमलबजावणी करताना लागणाऱ्या काही मदतीसाठी जमात ए इस्लामी हिंद, लातूर सदैव सहकार्य करेल. वरील सर्व मागण्यांची पूर्तता लवकर करावी, अशी मागणी जमाअते इस्लामी हिंद लातूर करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande