निसर्गाच्या सानिध्यात मेळघाटचे वनवैभव जपणारा नरनाळा महोत्सव
अकोला, 8 डिसेंबर (हिं.स.)।सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव,आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, हेरिटेज वॉक वनपर्यटन,नौकाविहार आदी वैशिष्ट्य
P


अकोला, 8 डिसेंबर (हिं.स.)।सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव,आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, हेरिटेज वॉक वनपर्यटन,नौकाविहार आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतील.या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून निसर्गाला कुठलीही हानी न पोहोचवता निसर्गाच्या सानिध्यात व निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे उपक्रमातून महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची तयारी सुरू आहे.पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडणार असून, नौकाविहार, सफारी, आदिवासी नृत्यकला सादरीकरण, पक्षीनिरीक्षण, गड भटकंती, गिर्यारोहण आदी साहसी खेळ,छायाचित्र प्रदर्शन याबरोबरच अनेकविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विविध उपक्रमातून अधोरेखित होणार आहे.वनपर्यटनाबरोबरच पॅरासेलिंग व साहसी खेळांचा महोत्सवात समावेश आहे. वन्यजीवनाची सफर घडविण्याबरोबरच विविध कलाप्रदर्शनातून सातपुड्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यासाठी सुसज्ज दालने महोत्सवात असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande