अकोला जि.प समोर बीडीओं चे सामुहीक रजा आंदोलन
अकोला, 8 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी घरकुल व मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी दिनांक ८ डिसेंबर पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केल
P


अकोला, 8 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी घरकुल व मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी दिनांक ८ डिसेंबर पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी अकोला व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना निवेदन देण्यात आले. जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत सामूहिक रजेवर राहण्याचा निर्णय संघटनेने निवेदनामध्ये नमूद केला आहे.

दि. 2 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना कोणतीही प्राथमिक चौकशी व विभागाची पूर्वपरवानगी न घेता अटक केली व त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. तेव्हा संघटनेचे राज्यभरातील अधिकारी यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.

आज अकोला जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सामूहिक रजा आंदोलन राज्यसंघटनेच्या निर्देशानुसार पुढे चालु ठेवण्यात येत असल्याबाबत चा निर्णय

निवेदनातून कळविला .

निवेदन व धरणे आंदोलनात संघटनेच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे ,उपाध्यक्ष तथा गटविकास अधिकारी तेल्हारा अशोक बांगर, उपाध्यक्ष तथा सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश खुमकर, कार्याध्यक्ष तथा सहाय्यक गटविकास अधिकारी एच जे परिहार, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर मिलिंद मोरे, गटविकास अधिकारी बार्शीटाकळी आर.पी पवार, गटविकास अधिकारी अकोला जयश्री वाघमारे, गटविकास अधिकारी अकोट माया वानखडे, गटविकास अधिकारी बाळापूर बंडू पजई, गटविकास अधिकारी पातूर सतीश नायसे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, सुभाष काळे, शेख अख्तर अब्दुल खलील, प्रेमा पटोकार, अर्चना काळे आधी अधिकारी धरणे आंदोलनात सहभागी होवून मागण्यांबाबत निदर्शने केलीत

सदर आंदोलनास राजपत्रित अधिकारी महासंघ , जि प कर्मचारी युनियन, ग्रामसेवक युनियन, विस्तार अधिकारी पंचायत संघटना, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती , कास्ट्राईब शिक्षक संघटना, लेखा कर्मचारी संघटना , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनांनी आंदोलन स्थळी भेट देवून पाठींबा जाहीर केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande