अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन संपन्न; 1800 हून अधिक धावपटूंचा सहभाग
नाशिक, 8 डिसेंबर (हिं.स.)। - नाशिकचे साहसी तसेच नियमित पर्यटन वाढवणे या उद्देशाने गेल्या 4 वर्षापासून अंजनेरी पर्वताच्या पायवाटांवर आयोजित होणारी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा यावर्षी नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. अत्यंत आव्हानात्मक
अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन संपन्न; 1800 हून अधिक धावपटूंचा सहभाग


नाशिक, 8 डिसेंबर (हिं.स.)।

- नाशिकचे साहसी तसेच नियमित पर्यटन वाढवणे या उद्देशाने गेल्या 4 वर्षापासून अंजनेरी पर्वताच्या पायवाटांवर आयोजित होणारी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा यावर्षी नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. अत्यंत आव्हानात्मक आणि सुंदर अशा अंजनेरी पर्वतरांगातून आयोजित होणाऱ्या स्पर्धेचे या वर्षीचे ब्रीदवाक्य ‘रन फॉर ग्रीन’ असे होते . ही स्पर्धा 5,10,15,,30 व 50 किमी अंतर अशा पाच गटात झाली.संपूर्ण भारतातून 1800 हून अधिक धावपटू यात सहभागी झाले.

नाशिकचे माजी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली आहे.नाशिक शहरात आरोग्य आणि साहसी संस्कृतीला प्रोत्साहन देणे तसेच भारतातील सर्वोत्तम क्रीडा व साहसी पर्यटन स्थळ म्हणून नाशिक विकसित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.यावर्षी स्पर्धेचे हे 5 वे वर्ष होते

विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रदान करण्यात आली . पारितोषिक वितरण समारंभास अभिनेता आणि निवेदक मनीष पॉल, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकचे उपसंचालक प्रशांत खैरे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, ग्रेप काउंटी चे संचालक किरण चव्हाण आणि तेजस चव्हाण, आयकर आयुक्त अमित सिंग या मान्यवरांची उपस्थिती प्रमुख होती

याप्रसंगी मोतीवाला स्कूल ऑफ फिजिओथेरपी ,झेन फिजिओ यांच्यातर्फे फिजिओथेरपी व सुयश हॉस्पिटल,नाशिक यांच्यातर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.

स्पर्धेची यंदाची वैशिष्ट्ये-

* रिसायकल प्लास्टिकची पदके: स्पर्धेत वापरली गेलेली पदके ही रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेली होती, ज्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर होतो.*पुनर्वापर केलेल्या लाकडाच्या ट्रॉफिज: विजेत्यांसाठीच्या ट्रॉफिज या पुनर्वापर केलेल्या लाकडापासून तयार केलेल्या होत्या .*5000 हून अधिक वृक्षारोपण: या उपक्रमात सहभागी प्रत्येक धावपटूच्या मागे अंजनेरी परिसराच्या आजूबाजूला 5000 हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.*गिधाड संवर्धनाबद्दल जागरूकता: वन विभागाच्या भागीदारीने, ही धाव गिधाड संवर्धनाबद्दल देखील जागरूकता पसरवणार आहे.*20 ग्रामीण मुलांचा सहभाग प्रायोजित: या वर्षीपासून अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रनमध्ये जवळपासच्या 20 ग्रामीण मुलांना सहभागासाठी प्रायोजित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande