बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहका
बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व


सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहकारी संस्थांना होती. त्यासाठी, रविवार मतदान प्रक्रिया संपन्न झाली. बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी 96.48 टक्के एवढे मतदान झाले. त्यामुळे, आज सकाळपासूनच निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली असून 18 जागांपैकी हाती आलेल्या 11 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन केले. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, 18 जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील 2 जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित 16 जागासाठी काल चूरशीने मतदान झालं. सुमारे 96.98 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती. याशिवाय 4 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. त्यामुळे, आज विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande