
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।
बीड ते अहिल्यानगर मार्गावरील एका हॉटेलमधून दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात बीड जिल्ह्यातील पोलिसांना यश मिळाले आहे.
एका हॉटेलमधीलमहिलेचे दागीने चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अमळनेर पोलिसांनी अटक केली.
या दोन आरोपींना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
सरुबाई शहादेव दहिफळे या काम करत असताना ४ अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. चोरटे कार घेऊन पळाले. दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तपासाअंती पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली कार भडकेल शिवारात सापडली. कारच्या नंबरवरून चोरट्यांचा शोध घेतला.
आरोपी इंदापूर तालुक्यातील असून एकजण माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील आहे. ते सराईत गुन्हेगार असून पत्त्यावर राहत नव्हते. मोबाईल वापरत नसल्याने तपासात अडथळा येत होता. तांत्रिक मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे ५
वालचंदनगर, पुणे दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केले. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ, भारत राठोड, तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे राऊत व स्वामी यांनी ही कारवाई केली. दोघा आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, पाटोदा येथे हजर केले असता ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत त्यांच्याकडून चोरी गेलेल्या दागिन्यांची माहिती घेतली जाणार आहे. फरार साथीदारांचा शोधही घेतला जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis