
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।
उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय झाल्याने थंडीचे कमबॅक झाल्याचे पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे जवळपास 11 अंश सेल्सिअस एवढे तापमान घटले आहे.
हिंदी महासागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला .यामुळे थंडी कमी झाली होती. तापमानात वाढ झाली होती. डिसेंबरमध्येही उन्हाळ्यासारखी हवा जाणवत होती. आता मात्र, हवामानात पुन्हा बदल झाला आहे. थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. किमान तापमान १२ अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. सकाळी दाट धुके राहील. रात्री थंडी अधिक जाणवेल. नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा.
थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. यामुळे आर्द्रता कमी झाली आहे. तापमान झपाट्याने घसरत आहे. थंडीची तीव्रता वाढत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis