
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)सोलापूर शहरातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या कारवाईपूर्वी महापालिकेकडून उपलब्ध केलेला पर्यायी 54 मीटर रस्ता अद्याप पूर्णपणे तयार नसल्याने वाहतुकीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने हा रस्ता ‘तात्पुरता पर्याय’ म्हणून खुला केल्याचे सांगितले असले, तरी येथे दररोज मोठ्या प्रमाणात खोदकाम, डांबरीकरण कामे सुरूच आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरु करणे शक्य नसल्याची स्थिती आहे.
शंभर वर्ष जुना झालेला रेल्वेचा धोकादायक पूल पडला जाणार आहे. रस्ते महामार्ग आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे पूल पडण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी यंत्रणेची जमवा जमाव केली गेली आहे. पोलिस यंत्रणेकडून मंगळवार पासून या मार्गावरील वाहतुक एका वर्षासाठी बंद असल्याचे जाहीर केले आहे.
या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गवर वळवण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या 54 मीटर रस्त्यांचे काम अद्याप चालू आहे. अभिमानश्री नगर जवळ बाजूने असलेल्या बोगदा एका बाजूने खोदाई करून सिमेंट क्राँक्रिट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड