
कोल्हापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण निर्मुलन मोहिम सुरु केली. दिंगबर जैन मठ ते खानाविलकर पंप दरम्यान रोडवरील अतिक्रमणे आज काढून टाकण्यात आली.
कोल्हापूर शहरातील रस्ते आणि पदपथ मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीनी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कर्मचारी, अधिकारी पथक, जेसीबी मशीन, डंपर यांच्या सहाय्याने उच्च न्यायालया जवळील चिमाजी चौक ते खानविलकर पंपा पर्यंतच्या रोडवरील अतिक्रमणे हटवली. ही मोहिम नियमितपणे सुरु ठेवून शहरातील रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar