
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.) : शेतातील पिकांचे झालेले नुकसान, नापीकीमुळे आर्थिक अडचणींचा डोंगर यामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील खडकत घडली असल्याचे सांगण्यात आले आहे
याप्रकरणी आष्टी पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक राघू जेवे (६०) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व नापीकीमुळे ते नैराश्यात होते. शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात सागर जेवे यांच्या माहितीवरून अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis