भारत-द.आफ्रिकेमधील पहिला टी-20 सामना कटकमध्ये रंगणार
कटक, 8 डिसेंबर (हिं.स.) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांना ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या रोमांचक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची मेजवानी मिळणार आहे. दोन्ही संघ आगामी मालिकेस
हार्दिक पांड्या


कटक, 8 डिसेंबर (हिं.स.) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांना ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या रोमांचक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची मेजवानी मिळणार आहे. दोन्ही संघ आगामी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. या प्रतिष्ठित मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेची सुरुवात दमदार पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

शुभमन गिल पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास अभिषेक शर्मासोबत खेळण्याची खात्री आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये, या दोन्ही खेळाडूंनी टी-२० स्वरूपात भारतीय डावाची सुरुवात केली आहे. या काळात संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. अभिषेक सुरुवातीपासूनच विरोधी गोलंदाजांवर दबाव निर्माण करतो, तर गिल संयमाने खेळत एक बाजू लावून धरतो.

मधल्या फळीचे नेतृत्व कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांच्याकडे असेल. सूर्याचा फॉर्म सध्या खालावलेला आहे. पण त्याच्या स्फोटक फलंदाजीची सर्वांनाच जाणीव आहे. तरुण तिलक संघाच्या विजयात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. जितेशला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळालेली नाही, परंतु त्याने आयपीएलमध्ये आपली क्षमता दाखवली आहे.

भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यात तीन अष्टपैलू क्रिकेटपटूंना मैदानात उतरवू शकतो. यामध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांचा समावेश असू शकतो. हे तिन्ही क्रिकेपटू बॅट आणि बॉल दोन्हीने सामना भारताच्या बाजून झुकवू शकतात.

दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांना संघात समाविष्ट केले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना निश्चिती मिळाली आहे. वरुण चक्रवर्ती हा देखील मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून विचारात घेता येईल. चक्रवर्तीने अलिकडच्या काळात फिरकी गोलंदाज म्हणून अपवादात्मक कामगिरी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande