कोल्हापूरात क्रांतीकारकांची माहिती आणि शिवकालीन शस्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या निमि
सव्यासाची गुरुकुलम वतीने शस्त्र प्रदर्शन


कोल्हापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।

हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या निमित्ताने पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात ७ आणि ८ डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणारे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सव्यासाची गुरुकुलम वतीने ऐतिहासिक, दुर्मिळ शिवकालीन शस्रास्रांचे विशेष प्रदर्शन लावण्यात होते. या प्रदर्शनाचा लाभ विविध शाळांमधील ५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. हे प्रदर्शन पाहून अनेकांनी ‘जाज्वल्य इतिहासाचे स्मरण झाले’, असे सांगितले.

सव्यासाची गुरुकुलम वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनात ढाल, तलवार, भाला, जांभिया, कट्यार यासंह अनेक दुर्मिळ शस्रे ठेवण्यात आली होती. प्रदर्शन पाहिल्यावर ‘दि न्यू एज्युकेशन सोसायटी’चे उपसचिव सूर्यकांत चव्हाण म्हणाले ‘‘हे प्रदर्शन, तसेच घेण्यात येणारे प्रशिक्षण युवतींच्या मनाचा ठाव घेणारे असल्याने ते अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही यापुढील काळातही तुमच्या पूर्णपणे पाठिशी आहोत.’’, तर ‘दि न्यू एज्युकेशन सोसायटी’चे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी अशा प्रदर्शनांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी सव्यासाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य लखन जाधव, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande