नगरपरिषद निवडणूक मतमोजणी, एमपीएससी परीक्षा ४ व ११ जानेवारीला
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठ
नगरपरिषद निवडणूक मतमोजणी, एमपीएससी परीक्षा ४ व ११ जानेवारीला


मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)

- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठी परीक्षा केंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर,कर्मचाऱ्यांची कमतरता, वाहतूक कोंडी व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे आयोगाने कळवले आहे.

परीक्षा सुधारित दिनांक

गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande