
फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिकचा पहिला यशस्वी वर्षपूर्ती सोहळा
नाशिक, 8 डिसेंबर (हिं.स.) : नाशिक शहरातील फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलने आपला पहिला वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा केला. गेल्या वर्षभरात नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल हॉटेलचे व्यवस्थापक सिद्धार्थ जोशी यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक पाहुणचाराची ऊब आणि मॅरियटच्या जागतिक दर्जाच्या सेवांचा सुंदर संगम देण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
मॅरियट इंटरनॅशनल या जागतिक हॉस्पिटॅलिटी ग्रुपचा भाग असलेले हे हॉटेल नाशिककरांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देते. शहराचे तसेच सह्याद्री पर्वतरांगांचे अद्वितीय दृश्य अनुभवण्याची संधी देणारे ‘आर्बर किचन’ हे ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट पाहुण्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच प्रीमियम कॉफी, स्नॅक्स आणि हँडक्राफ्टेड पेयांसाठी ‘इंटरमेझो कॅफे’ हे अनेकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
वर्षपूर्ती निमित्त इंटरमेझो कॅफे मध्ये एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. कोणतेही पेय ऑर्डर करणाऱ्या पाहुण्यांना मोफत बेकरी आयटम देण्यात येणार आहे. याशिवाय, २० डिसेंबर २०२५ रोजी हॉटेलच्या इंस्टाग्राम पोस्टला टॅग करून शेअर करणाऱ्या पाहुण्यांना रात्रीच्या बुफेवर ३०% सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती हॉटेलचे जनरल मॅनेजर सिद्धार्थ जोशी आणि विक्री व विपणन संचालक अक्षत आर्या यांनी दिली. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना अधिक समृद्ध व आनंददायी अनुभव मिळेल, असा विश्वास हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्त केला.
फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिक हे मॅरियट बॉनव्हॉय या जागतिक लॉयल्टी प्रोग्रामशी संलग्न आहे. या प्रोग्रामद्वारे पाहुण्यांना जगभरातील ८५०० पेक्षा अधिक हॉटेल्समध्ये पॉइंट्स कमावण्याची आणि विविध विशेष सुविधा मिळवण्याची संधी उपलब्ध होते. नाशिकमधील या पहिल्या वर्षपूर्तीने शहराच्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उत्साहाची नवी लहर निर्माण केली आहे.
गुरुवारपासून काश्मिरी पंडित फूड फेस्टिव्हलची मेजवानी
दिनांक ११ ते १४ डिसेंबर दरम्यान ‘काश्मिरी पंडित फूड फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात शेफ राहुल वाली यांच्या हस्ते तयार केलेल्या पारंपरिक काश्मिरी पदार्थांची अनोखी मेजवानी नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे. त्यानंतर ख्रिसमस व नववर्ष स्वागतासाठी विशेष कार्यक्रम, उत्सवी सजावट आणि मर्यादित कालावधीतील खास मेन्यू उपलब्ध असतील.
आगामी कुंभमेळ्यानिमित देखील व्यवस्था
आगामी कुंभमेळ्यानिमित राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाहुण्यांसाठी देखील खास व्यवस्था हॉटेलतर्फे केली जाणार असल्याचे व्यवस्थापक जोशी यांनी सांगितले. प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर देश विदेशातील चर्चासत्र , बैठका
देखील या ठिकाणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV