
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। मोर्शी पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत मोठी कामगिरी बजावली आहे. अट्टल मोटरसायकल चोर लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे (वय २५, रा. मोरचुद, वरूड) आणि त्याचा साथीदार गौरव सुरेशराव जामोदकर (वय २६, रा. खेड, मोर्शी) यांना अटक करून तब्बल २६ चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात मोर्शी पोलिसांना यश आले आहे. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ९,२०,००० रुपये इतकी आहे.फिर्यादी अक्षय कमलाकर साबळे यांच्या तक्रारीवरून २ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती मोर्शी आवारातून एमएच २७ एजे ४४७१ क्रमांकाची मोटरसायकल चोरी झाल्याने पोलीस स्टेशन मोर्शी येथे अपराध क्र. ५६९/२०२५ कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत ठाणेदार पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष सूचना दिल्या. तपासदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे चोरीचा मास्टरमाइंड लवकेश भोगे मोर्शीत भाड्याने राहत असल्याचे समोर आले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली तसेच ती मोटरसायकल गौरव जामोदकर याला विकल्याचेही सांगितले.यानंतर दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणांहून २६ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे हा मोठा चोरीसराईत रॅकेट उघडकीस आले असून अन्य गुन्ह्यांचीही पडताळणी सुरू आहे.मोर्शी पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. आरोपीतांचे ताब्यातुन एकुण २६ मोटर सायकली एकुण किं अं ९,२०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या असुन पो.स्टे गाडगेनगर, पो. स्टे सिटी कोतवाली, पो स्टे राजापेठ जि अमरावती शहर तसेच पो स्टे कारंजा लाड जि वाशिम, पो स्टे मुर्तिजापुर जि अकोला येथिल गुन्हयात चोरी गेलेल्या मोटर सायकली जप्त करून एकुण २५ गुन्हे उघडकीस आणले असुन पुढील तपास चालु आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर साहेब, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे ठाणेदार पो स्टे मोर्शी यांचे नेतृत्वात पो.स्टे. मोर्शी येथील गुन्हे प्रकटीकरा पथकाचे पोउपनि आकाश शिवणकर, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी