
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)। नांदेडवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २५ डिसेंबरपासून मुंबई – नांदेड – मुंबई ही विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा सध्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे यांनी यासाठी प्रयत्न केले.
या विमानसेवेचा लाभ नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम तसेच परिसरातील सर्व जिल्ह्यांतील प्रवाशांना होणार आहे. सदर सेवेकरिता स्टार एअर या विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर बुकिंग सुरू करण्यात आले आहे. दिल्ली येथे झालेल्या मागील भेटीदरम्यान नांदेड–मुंबई विमानसेवा सुरू व्हावी यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.
त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ही सेवा प्रत्यक्षात सुरू होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis