राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे अपघाती निधन
नागपूर,08 डिसेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे गडचिरोली–नागपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ हा अपघात घडला. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना त्यां
गीता हिंगे


नागपूर,08 डिसेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे गडचिरोली–नागपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ हा अपघात घडला. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना त्यांची वाहनदुर्घटना झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या गीता हिंगे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 26 नोव्हेंबर रोजी, नगराध्यक्षपदाचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला होता. पक्षप्रवेश होताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षा ही जबाबदारी देण्यात आली होती.यापूर्वी त्या भाजपच्या जिल्हा अध्यक्ष, तसेच जिल्हा महामंत्री या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून गडचिरोलीच्या राजकारणात त्यांनी लक्षणीय योगदान दिले होते. राजकारणासोबतच त्या सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होत्या. आधार विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत केली आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले.गीता हिंगे यांच्या अचानक झालेल्या निधनाने गडचिरोली–नागपूर परिसर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत शोककळा पसरली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande