
गडावरील ग्रामस्थांचा दोन तास रास्ता रोको
वणी, 8 डिसेंबर (हिं.स.)।
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन लेखी आश्वासन देत नाही, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार या भुमीकेवर गडावरील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
कालच सप्तश्रृंगी गडावर भवरी धबधबा या ठिकाणी पिंपळगाव येथील भाविकांच्या ईन्होवा गाडीचा अपघातात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याने गडावरील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, व मुजोर ठेकेदाराच्या विरोधात सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता . कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहिणी वसावे मॅडम यांना रस्त्यावरील समस्यांचा पाढाच वाचला,नांदुरी ते सप्तशृंग गड या घाट रस्त्याचे कॉक्रोटकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. परंतु सदर काम अपुर्ण स्थितीत बंद पडलेले आहे. सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी काहीही दिसत नाही, त्यामुळे भाविक भक्त व ग्रामस्थ बांधवांना वाहने चालवितांना सतत त्रास होत आहे. याबाबत यापुर्वीही आंदोलन करणे बाबत निवेदन दिले होते. परंतु तात्पुरते आश्वासन देवुन पुढे सदर कामाबाबत कोणतेही दखल घेण्यात आली नाही.
तसेच दिनांक ०७/१२/२०२५ रोजी घाट रस्त्यावर सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झालेले नसल्याने मोठा अपघात होवुन पिंपळगांव येथील सहा इसम मयत झाले आहेत. याबाबत आपले विभागाने वेळावेळी दखल न घेतल्याने सदर अपघात झाला आहे. त्यामुळे आपल्या विभागावर जो पर्यत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवु. यावेळी महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, मोठ्या प्रमाणात कळवणचे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, यावेळी गडावरील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वकील,पत्रकार, गडावरील महीला व ग्रामस्थ,सर्व पक्षीय नेते,स्थानिक दुकानदार, युवा वर्ग, व्यापारी वर्ग, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटरवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
नांदुरी ते सप्तशृंगगड
हा दहा किलोमीटरचा हा घाट रस्ता सध्या खड्ड्यांनी पोखरून निघाला असून, भाविकांच्या हालअपेष्टांना अंतच राहिलेला नाही. मोठमोठे खड्डे, उखडलेले कांक्रीटीकरण आणि खडी यामुळे हा रस्ता भाविकांसाठी, गावक-यांसाठी, अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, वयोवृद नागरिक, आणि आई जगदंबेच्या येणाऱ्या भाविकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यंमुळे अपघातग्रस्त झाले असून, नागरिकांच्या व भाविकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
घाट रस्त्याचे काम सुरू न केल्यास शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) रास्ता रोको करून तीव्र आंदोलन
करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता
तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ईशा-याकडे अक्षरशः दुर्लक्ष केले .व कालचीच घटना झाली
कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रोज गडावर येत असतात परंतु त्यांच्या वातानुकूलित चार चाकीगाडीत त्यांना रस्त्याची दुर्दशा कशी दिसत नाही हाच मोठा प्रश्न गावक-यांना पडलेला दिसतो. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की धोंड्या कोंड्या विहरीजवळी रस्ता, ग्रामपंचायत टोलनाकाजवळील रस्ता, व सुक्र्या बाबा वळणावर या सर्व ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरू असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दररोज हजारो भाविक या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे
या रस्त्याची दुर्दशा केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गंभीर फटका बसत आहे. नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
: नांदुरी ते सप्तशृंग गड या घाट रस्त्याचे कॉक्रोटकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. परंतु सदर काम अपुर्ण स्थितीत बंद पडलेले आहे. सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी काहीही दिसत नाही, त्यामुळे भाविक भक्त व ग्रामस्थ बांधवांना वाहने चालवितांना सतत त्रास होत आहे. याबाबत यापुर्वीही आंदोलन करणे बाबत निवेदन दिले होते. परंतु तात्पुरते आश्वासन देवुन पुढे सदर कामाबाबत कोणतेही दखल घेण्यात आली नाही.
तसेच दिनांक ०७/१२/२०२५ रोजी घाट रस्त्यावर सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झालेले नसल्याने मोठा अपघात होवुन पिंपळगांव येथील सहा इसम मयत झाले आहेत. याबाबत आपले विभागाने वेळावेळी दखल न घेतल्याने सदर अपघात झाला आहे. त्यामुळे आपल्या विभागावर जो पर्यत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवु.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV