प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत सुधारणा ₹50,000 पर्यंत स्वस्त कर्ज उपलब्ध!
लातूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। ​शहरातील पारंपरिक कारागीर आणि कुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) कर्ज सुविधेत महत्त्वपू
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना


लातूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।

​शहरातील पारंपरिक कारागीर आणि कुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) कर्ज सुविधेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे कारागिरांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करणे अधिक सुलभ होणार आहे.

​टप्प्याटप्प्याने कर्जाची उपलब्धता

बँकेकडून अल्प व्याज दराने उपलब्ध असलेल्या या कर्ज सुविधेत आता सुधारणा करण्यात आली आहे.

​पहिला टप्पा: लाभार्थ्याने सुरुवातीला ₹15,000 कर्ज घ्यावे आणि ते यशस्वीरित्या फेडल्यानंतर...

​पुढील टप्पे: त्यांना गरजेनुसार ₹25,000 आणि त्यानंतर ₹50,000 पर्यंत कर्ज दिले जाईल.

​यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना टप्प्याटप्प्याने आणि खात्रीशीर आर्थिक साहाय्य मिळणार आहे.

​अर्ज छाननीची प्रक्रिया गतिमान

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत आलेल्या हजारो नागरिकांच्या अर्जांची छाननी (तपासणी) करण्याची प्रक्रिया प्रशासनाने गतिमान केली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकरच या सुविधेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

​लाभार्थ्यांना मनपा आयुक्तांचे आवाहन

मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना यांनी शहरातील पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना (DAY-NULM) अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उपजीविकेला बळकटी द्यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande