
इस्लामाबाद , 8 डिसेंबर (हिं.स.)। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते आणि त्याच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडून शांततेच्या वाटेवर येईल अशी अपेक्षा होती.मात्र, पाकिस्तान अजूनही पीओकेमध्ये लश्कर-ए-तैयबा मोठा कट रचण्यात गुंतलेले आहे. पीओकेमधील रावळकोट येथे लश्करच्या जिहादींसाठी एक ‘लाँच पॅड’ तयार केले जात आहे आणि त्याचे फोटो आता व्हायरलं होत आहेत.
लाँच पॅड म्हणजे असे दहशतवादी केंद्र, जिथे आतंकवादी भारतात घुसखोरी करण्यापूर्वी एकत्र येतात आणि शेवटची तयारी करतात. याला दहशतवाद्यांचे अंतिम प्रवेशद्वार मानले जाते. पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने पीओके मधील अशाच दहशतवादी लाँच पॅडचा नाश केला होता. पण आता स्वतः लश्करच्या पीओके प्रवक्त्याने रावळकोटमध्ये केंद्र तयार करण्याची कबुली दिली आहे. खरं तर लश्कर-ए-तैयबा पीओके मध्ये ‘केंद्र’च्या नावाखाली दहशतवादी लाँच पॅड उभारण्यात व्यस्त आहे. रावळकोटच्या खैगला भागात एक इमारत बांधली जात आहे, ज्यात लश्कर आपल्या दहशतवाद्यांसाठी लाँच पॅड आणि आसरा तयार करत आहे.
हे ‘ड्युअल यूज’ (दुहेरी वापराचे) केंद्र असल्याचे सांगितले जाते आणि याचे नाव ‘अल-अक्सा मरकज’ आहे. वरकरणी लश्कर याला मशिदीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये लश्करचा पीओके प्रवक्ता आमिर जिया देखील सुरुवातीला याला मशिदीचे नाव देतो, परंतु बोलताना चुकून ‘केंद्र’ म्हणतो आणि त्यातून खरी मंशा स्पष्ट होते.लश्करची रणनीती हीच आहे की पीओके मधील वेगवेगळ्या भागांत छोटे-छोटे केंद्र तयार करावे आणि त्यामध्ये दहशतवाद्यांना लपवून ठेवण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था उभारावी.
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही दावा करीत असला की त्याने दहशतवादाचा मार्ग सोडला आहे, तरी सत्य हेच आहे की तेथे दहशतवादी संघटना बिनधास्तपणे वाढत आहेत आणि त्यांना मोकळी मुभा दिली जात आहे. याचे आणखी एक पुरावे समोर आले आहेत. पाकिस्तानमध्ये लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदची मोठी बैठक झाली आहे. या जिहादी बैठकीचे खास फोटो आता समोर आले आहेत.
6 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर येथे ही बैठक झाली. बैठकीत जैशचे अनेक कमांडर आणि लश्करचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसुरी एकत्र बसलेले दिसत आहेत. या बैठकीची माहिती 6 नोव्हेंबरला माध्यमांना मिळाली होती. ऑपरेशन सिंदूरपूर्वी देखील अशीच बैठक बहावलपूरमध्ये झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode