
परभणी, 8 डिसेंबर (हिं.स.)। महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पदनियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर, संघटन मंत्री संजय कौडगे, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी महानगरातील विविध पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
हॉटेल रामायणा, वसमत रोड येथे मोठ्या उत्साहात झालेल्या या सोहळ्यात संघटन मंत्री संजयजी कौडगे, परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, प्रेरणाताई वरपुडकर, राजेश देशमुख, सुनील देशमुख, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, मंगलताई मुदगलकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, विविध मोर्चे, प्रकोष्ठ व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजपा प्रेरित नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थितीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. अखेरीस नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis