परळी : धर्माधिकारीच्या पतीवर गंभीर आरोप
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)। परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या मतदानानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगर
परळी : धर्माधिकारीच्या पतीवर गंभीर आरोप


बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।

परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या मतदानानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांजवळ तुम्ही दीपक देशमुख यांच्यासोबत राहु नका, अण्णा लवकरच बाहेर येत असुन देशमुख हे साहेबांच्या रडारवर आहेत. असे बोलुन मला जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केली आहे. राजेभाऊ फड यांच्या संपर्क कार्यालयात दिपक देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनिल मस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लीप ऐकवत गंभीर आरोप केले.

अण्णा लवकरच येत आहेत, दीपक साहेबांच्या रडारवर असुन तुम्ही माझ्यासोबत रहा. बऱ्याच रजिस्ट्री कराक्याच्या आहेत असे संभाषण यात आहे.

२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात शहरातील प्रभाग क्रमांक १,११ आणि १२ मध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळा पडदा टाकुन बोगस मतदान केले जात होते. या तिन्ही प्रभागातील सीसीटीव्ही फुटेज घेवुन फेर मतदान घ्यावे अशी मागणी दीपक देशमुख यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande