पुणे पुस्तक महोत्सवचे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्गुसन कॉलेज येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे तिस
nsns


पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्गुसन कॉलेज येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे तिसरे वर्ष असून गेल्या तीन वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याकरता पुणे पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे 9 डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजन केले जाणार आहे, यामाध्यमातून समाजातल्या सर्व घटकांनी आपापल्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे यातून हे अभिप्रेत आहे.

पुणे शहरातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा पुस्तक वाचावे व त्यानंतर आपला फोटो काढून क्युआर कोडवर फोटो अपलोड करून

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande