मालेगावमध्ये दोन आधार सेंटरवर छापे, चौघे ताब्यात
मालेगाव, 8 डिसेंबर (हिं.स.)। - शहर पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी आधार केंद्रांवर छापे टाकले. या केंद्रांमधून बनावट आधारकार्ड तयार करून दिले जात असल्याचा संशय आहे. केलेल्या कारवाईत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात
मालेगावमध्ये दोन आधार सेंटरवर छापे, चौघे ताब्यात


मालेगाव, 8 डिसेंबर (हिं.स.)।

- शहर पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी आधार केंद्रांवर छापे टाकले. या केंद्रांमधून बनावट आधारकार्ड तयार करून दिले जात असल्याचा संशय आहे. केलेल्या कारवाईत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता बनावट आधारकार्डचा घोटाळा समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांनी इस्लामपुरा व पवारवाडी भागातील केंद्रांवर छापे टाकून काही आधारकार्ड व कागदपत्रे जप्त केली.

इतर राज्यातील आयडी वापरून आधारकार्ड तयार होत असल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत. दरम्यान, इस्लामपुरा येथील केंद्र झेरॉक्स सेंटर आहे. येथे अधिकृत केंद्र नसताना आधारकार्ड तयार करून दिले जात होते. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande