शैक्षणिक सहलींसाठी बीड जिल्ह्यासाठी ४४ बसेस राखीव
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)। पर्यटनाची आवड वाढवणे, महाराष्ट्रातील गडकोट व देवस्थाने सर्वसामान्यांच्या अल्पदरात सुरू केली आवाक्यात आणणे आणि प्रवाशांना सुरक्षित-सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सामूहिक पर्यटनासाठी विश
शैक्षणिक सहलींसाठी बीड जिल्ह्यासाठी ४४ बसेस राखीव


बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।

पर्यटनाची आवड वाढवणे, महाराष्ट्रातील गडकोट व देवस्थाने सर्वसामान्यांच्या अल्पदरात सुरू केली आवाक्यात आणणे आणि प्रवाशांना सुरक्षित-सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सामूहिक पर्यटनासाठी विशेष बससेवा सुरू केली आहे. 'लालपरी' आता पर्यटन पर्यटनाची नवी दिशा ठरू लागली असून आगारातही ही सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

या नव्या सुविधेमुळे धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एकाच वेळी, एकाच तिकीटात आणि सवलतीच्या दरात उत्कृष्ट प्रवासाचा लाभ मिळणार आहे. महिलांना ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत योजने'चा लाभ ही सुविधा इतर नियमित बसप्रमाणेच स्वतंत्र बससेवा उपलब्ध केली आहे. सर्व प्रवास सामूहिक असल्यास मागणीनुसार बसेस तत्काळ उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली असून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी आवश्यक त्या सर्व पर्यटन बसमध्येही लागू असेल.

राज्य परिवहन महामंडळाने ११ विशेष पर्यटन टण्यांची आखणी केली असून यात पंढरपूर-पन्हाळा - ज्योतिबा-कोल्हापूर-गणपतीपुळे, महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, तुळजापूर -अक्कलकोट -पंढरपुर पंढरपूर- - नरसोबाची वाडी, शनिशिंगणापूर - शिर्डी, वेरूळ अजिंठा-राजूर - गणपती दर्शन, देऊळगाव राजा - लोणार सरोवर -शेगाव गजानन महाराज मंदिर अशा महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रेचा समावेश आहे.

'बीड विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी तब्बल ४४ बसेस पर्यटन सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मागणीप्रमाणे या सर्व बसेस सर्वसामान्य दरात पर्यटनासाठी तत्पर राहतील.

सुविधा लागू राहणार आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सूविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande