शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 27 मधील पक्ष कार्यालय म्हणजे जनतेसाठी खुले व्यासपीठ - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर, 8 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख श्री. विनोद सोनवणे यांच्या प्रभाग क्रमांक 27 मधील पक्ष कार्यालयाचे आज शिवसेना नेते श्री. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी माजी विरोध
अ


छत्रपती संभाजीनगर, 8 डिसेंबर (हिं.स.)।

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख श्री. विनोद सोनवणे यांच्या प्रभाग क्रमांक 27 मधील पक्ष कार्यालयाचे आज शिवसेना नेते श्री. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेचे हे कार्यालय म्हणजे जनतेसाठी खुले व्यासपीठ आहे.असे अंबादास दानवे यांनी सांगितले विभागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी, अडचणींसाठी आणि सेवा कार्यासाठी हे कार्यालय सदैव तत्पर राहील, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, विजयराव साळवे, उपजिल्हाप्रमुख संतोष खेडके, विजय वाघमारे,शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, महिला आघाडी संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटिका अनिता मंत्री व जिल्हा संघटिका आशा दातार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande