सोलापूर -फ्लाय ९१ कडून ‘झीरो कन्व्हिनियन्स फी’ची घोषणा
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)फ्लाय ९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे.
Airport Solapur Today


सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)फ्लाय ९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती मागणी आणि उद्योगातील सुरू असलेल्या कार्यात्मक अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत, प्रवासी कोणत्याही उपलब्ध भविष्यकालीन प्रवास तारखेसाठी तिकिटे आरक्षित करू शकतात. यामुळे त्यांना थेट आर्थिक बचत तर मिळेलच, शिवाय सणासुदीच्या प्रवासाचे नियोजन सोपे होणार आहे. कन्व्हिनियन्स फी रद्द करण्यामागील विमानसेवेचा उद्देश म्हणजे ग्राहकांचे हित व तिकीट दरांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांच्या हिताला आमचे कायमचे प्राधान्य राहिले आहे. सध्या हवाई उद्योगासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही, सणासुदीच्या काळात प्रवाशांना तणावरहित आणि सहज नियोजनाची सुविधा मिळावी, यासाठीच हा निर्णय घेतला आहे. तिकिटे www.fly91.in या अधिकृत संकेतस्थळावरून कन्व्हिनियन्स फीशिवाय बुक करता येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande