
जळगाव, 8 डिसेंबर (हिं.स.) मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सुरु असलेली चढ उतार कायम आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून मात्र यातच सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. दोन्ही धातूंच्या दरात घसरण होण्याची अपेक्षा ग्राहकांना आहे. मात्र आज डिसेंबर महिन्यातील दुसरा आठवडा. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.आज ८ डिसेंबर रोजी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २७० रूपयांची वाढ झाली आहे. यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर १,३०,४२० रूपये प्रति १० ग्रॅमवर गेला आहे. २४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झालीये. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,५०० रूपये मोजावे लागतील.सोन्याच्या भावात वाढ जरी झाली असली तरी, चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज १ किलो चांदीमागे १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,८९,००० रूपये मोजावे लागतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर