कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करावीच लागणार, मनपा आयुक्तांची स्पष्टोक्ती
पर्यावरण प्रेमींची मोठी नाराजी, संघर्ष होण्याची शक्यता नाशिक, 8 डिसेंबर (हिं.स.)। - कुंभमेळा होणाऱ्या तपोवन या ठिकाणी असणारी वृक्षतोड ही करावीच लागणार असल्याचे ठाम मत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केले आहे त्यामुळे आता या सर्व प्रश्नावरत
कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करावीच लागणार, मनपा आयुक्तांची स्पष्टोक्ती


पर्यावरण प्रेमींची मोठी नाराजी, संघर्ष होण्याची शक्यता

नाशिक, 8 डिसेंबर (हिं.स.)।

- कुंभमेळा होणाऱ्या तपोवन या ठिकाणी असणारी वृक्षतोड ही करावीच लागणार असल्याचे ठाम मत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केले आहे त्यामुळे आता या सर्व प्रश्नावरती पर्यावरण प्रेमी नागरिक अजून संतप्त झाले असून यावर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नासिक मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्या साठी येणाऱ्या साधूमांतांची संख्या लक्षात घेऊन तपोवनात असलेली जागा कमी पडणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांची कत्तल करून साधू महंताना निवासस्थान करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर त्या कालावधीमध्ये या ठिकाणी नाशिककरांसाठी कायमस्वरूपी प्रदर्शनी केंद्र तसेच त्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे सध्या तरी साधुग्राम या ठिकाणी होणार असल्या तरी देखील त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिल्डरचा साम्राज्य होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमी नागरिक व्यक्त करीत आहे त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून या ठिकाणी पर्यावरण प्रेमी वेगवेगळ्या संघटना या आंदोलन करीत आहेत. आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, हिंदू एकता आंदोलन, भाजपा, कम्युनिस्ट पक्ष , यांच्यासह वेगवेगळ्या संघटना देखील सहभागी झालेले आहेत.

हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र पर्यावरण प्रेमी नागरिकांना आणि इतर संघटनांना आज सोमवारी महानगरपालिकेमध्ये आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. या पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या संघटनांचे 20 नागरिक उपस्थित होते प्रत्यक्षात आत्तापर्यंत हजारो हरकती आल्या असताना फक्त 20च नागरिकांना बोलवण्यात आलेले होते. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, उद्यान विभागाचे अधीक्षक भदाने, यांच्यासह अन्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी पर्यावरण प्रेमी नागरिकांची या सर्व प्रश्नांवर चर्चा केली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती ज्या ठिकाणी विरोध केला आणि वृक्षतोड होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली या सर्व प्रश्नांना आणि शंकांना उत्तर देताना मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितले की, नाशिककरांना तपोवन मध्ये कायमस्वरूपी पर्यटन केंद्र मिळणार असले तरीही ते ज्यावेळी सिंहस्थ कुंभ पर्व होईल त्यावेळी साधू महंताना राहण्यासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी जुनी वृक्ष आहे ती तशीच राहतील उर्वरित म्हणजेच जी अनावश्यक आहे आणि ज्यांचं काही काम नाही अशी वृक्ष ही तोडण्यात येणार असल्याचे सांगून मनपायुक्तांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जादूग्राम येथे वृक्षतोड ही होणारच आहे आणि ती करावीच लागणार आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यावेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आणि आयुक्तांचा निर्णय चुकीचे असल्याचे या बैठकीत स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता तपोवन आतील वृक्षतोडीवरून येणाऱ्या काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

महानगरपालिकेमध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांनी प्रशासन यांच्यामध्ये बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र तो मनामध्ये आंदोलन ही सुरूच होती. सोमवारी या ठिकाणी किन्नर समाजाच्या वतीने तपोवन वाचवा झाडे जगवा अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान दुसरीकडे वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील तपोवनामध्ये आंदोलन करण्यात आले. वारकरी संप्रदायाने देखील कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून तपोवन वाचले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande