
कोल्हापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)।
कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर भरवण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनात अखेरच्या दिवशी प्रदर्शन पहायला आलेल्या दोन गटातील तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसन थेट फ्री स्टाईल हाणामारीत झाले. अचानक सुरू झालेल्या या मारामारीमुळे प्रदर्शन पहायला आलेल्या इतर नागरीक कांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि पळापळ झाली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दोन गटातील काही तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर काही मिनिटांतच रागाच्याभरात एकमेकांच्या अंगावर धावून जात लाथाबुक्क्या मारत जोरदार मारहाण केली. यावेळी प्रदर्शना ठिकाणी असलेल्या मिळेल त्या वस्तूनेही मारहाण सुरु झाल्याने इतरांच्यात घबराहट पसरली.
या ठिकाणी असलेल्याबायका मुलांसह आलेल्या अनेकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. ही मारामारी कशामुळे झाली हे समजू शकले नाही
या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे या कार्यक्रमातील सुरक्षेव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून. पोलीसांनी याची दखल घेत संयोजकांकडे चौकशी सुरु केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून दोन्ही गटातील तरुणांचा या व्हिडीओच्या शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar