“दुसऱ्या अपत्यावर थांबा; स्त्री-बाल आरोग्यासाठी प्रबोधन गरजेचे” — मनोज रानडे
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)।जिल्हा परिषद, पालघरतर्फे कृपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण सुधारणा आणि नर्चर अ‍ॅपच्या प्रभावी वापरासंदर्भात उन्नत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जननायक बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी मन
“दुसऱ्या अपत्यावर थांबा; स्त्री-बाल आरोग्यासाठी प्रबोधन गरजेचे” — मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे


पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)।जिल्हा परिषद, पालघरतर्फे कृपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण सुधारणा आणि नर्चर अ‍ॅपच्या प्रभावी वापरासंदर्भात उन्नत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जननायक बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी भेट देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना रानडे म्हणाले,“अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. गरोदर व स्तनदा मातांची अचूक माहिती संकलित करणे आणि नोंदणी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ‘बाळाचे पहिले सुवर्णमय १००० दिवस’ हा उपक्रम काटेकोरपणे राबवला गेला तर कुपोषण कमी करण्याच्या दिशेने जिल्हा निश्चित प्रगती करेल.”तसेच त्यांनी दुसऱ्या अपत्यावर थांबण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. “कुटुंब नियोजन, योग्य आहार, माता-शिशु आरोग्य, आणि कुपोषण प्रतिबंध यासाठी समाजामध्ये सातत्याने प्रबोधन करणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत कुपोषित बालकांची सद्यस्थिती, VCDC, YCDC, तसेच NRC मध्ये दाखल बालकांसाठी आवश्यक हस्तक्षेप यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बालविकास प्रकल्प अधिकारी, डहाणू सतीश पोळ यांनी सर्व प्रकल्पनिहाय अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांना नर्चर अ‍ॅपवरील अद्यावत नोंदी, पोषण ट्रॅकरची माहिती, तसेच लाभ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, पालघर प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पालवी प्रकल्पाचे तुषार मराड, तसेच जिल्ह्यातील १२ ग्रामीण व ३ नागरी प्रकल्पांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande