
ठाणे, 08 डिसेंबर (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य एसयूव्ही निर्माता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या आगामी प्रीमियम एसयूव्हीचे अधिकृत नाव XUV 7XO जाहीर केले आहे. कंपनी 5 जानेवारी 2026 रोजी या एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमियर करणार आहे.
महिंद्राच्या लोकप्रिय XUV700 ने गेल्या चार वर्षांत 3 लाखाहून अधिक ग्राहकांची मनं जिंकत भारतीय एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवा मानदंड प्रस्थापित केला. हाच वारसा पुढे नेत XUV 7XO आणखी आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कामगिरीसह बाजारात उतरणार आहे.कंपनीच्या मते, नवीन मॉडेलमध्ये डिझाईन, इंजिनिअरिंग, आराम आणि परफॉर्मन्स या सर्व क्षेत्रांत लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. XUV700 च्या सिद्ध क्षमतांवर आधारित असले तरी, XUV 7XO ही फक्त अपग्रेड नसून एक पूर्णपणे नवीन आणि प्रीमियम अनुभव देणारी एसयूव्ही असेल, असे महिंद्राने स्पष्ट केले.
प्रीमियम एसयूव्ही श्रेणीत आपले नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली XUV 7XO, ‘उद्याची एसयूव्ही’ म्हणून भारतीय आणि जागतिक बाजारात नवा ट्रेंड स्थापित करण्यासाठी सज्ज आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी