राजकारणात परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच दिशादर्शक ठरतात : आमदार बाबासाहेब देशमुख
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो; परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच काळाला दिशादर्शक ठरतात”, असे मत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. आमदार डॉ. देशमुख म्हणाले, “राजकारणात टीका-टिप्पणी तर नेहम
राजकारणात परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच दिशादर्शक ठरतात : आमदार बाबासाहेब देशमुख


सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो; परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच काळाला दिशादर्शक ठरतात”, असे मत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

आमदार डॉ. देशमुख म्हणाले, “राजकारणात टीका-टिप्पणी तर नेहमीच असते. आज टीका करणारे उद्या सोबतही असू शकतात. आम्ही टीकेकडे फार लक्ष देत नाही. तालुक्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते.” नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत केलेल्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, “ही युती विकासाच्या दृष्टीने केली. आम्ही सर्वपक्षीय युतीचाही विचार केला होता; पण काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र तालुक्याचा विकास आणि लोकांचे प्रश्‍न सोडवणे हेच लक्ष्य असल्याने उपलब्ध परिस्थितीत योग्य वाटणारा निर्णय घेतला.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत ते म्हणाले की, “युती किंवा आघाडीबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. निवडणुका लागल्या की कार्यकर्त्यांसोबत, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच अंतिम धोरण ठरवू. ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आगामी निवडणूकीत ही आघाडी अशीच राहील, त्यामध्ये बदल होतील किंवा इतर पक्षही सामील होतील. राजकारणात काहीही घडू शकते त्यामुळे आजच त्याबाबत बोलणे उचित होणार नाही

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande