
नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तपोवन मधील वृक्षतोडीला सर्व नाशिककरांचा विरोध आहे प्राणवायू देणारे हे तपोवन या परिसरातील नाशिकच्या जनतेची भावना जोडलेली आहे वृक्ष तोडून निसर्गाचा ऱ्हास करण्याचा जो घाट सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने घातला आहे आणि ठेकेदारांच्या मदती करता नाशिकच्या जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने नाशिककरांच्या भावनेशी खेळू नये येथील झाडच नव्हे ते एकही फांदी तुटू दिले जाणार नाही असे प्रतिपादन नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वनभोजन करून या तपोवन बचाव संघर्षाला पाठिंबा देऊन साजरा केला या संघर्षातील अग्रगण्य माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी या तपोवन येथील परिसरात अनेक पशुपक्षी आपले जीवन जगतात तसेच या परिसरात अनेक ऋषीमुनींनी तपस्या केलेली आहे हे केवळ वृक्ष नसून यामध्ये जीवनाची मूल्य जडलेली आहेत. फक्त भ्रष्टाचार करण्याकरता या झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि ठेकेदारांना त्याचा फायदा मिळवून देणार आहे, हे नाशिक शहर कधीही सहन करणार नाही. यापुढे भव्य आंदोलन उभे केले जाईल व लवकरच लाखाचा मोर्चा प्रशासनावर काढला जाईल असे सांगितले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव नाशिकचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त, सह प्रभारी प्रदेश सचिव श्रुती मात्रे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, प्रदेश काँग्रेसचे सचिव नगरसेवक राहुल दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वनभोजन करून सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रभारी ब्रिज किशोर दत्त व सह प्रभारी श्रुती मात्रे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंबा जाहीर केला व काँग्रेस पक्ष या आंदोलनामध्ये पक्षाची जोडे बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून साथ देईल असे आश्वासन यावेळी दिले.
कार्यक्रम प्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आल्या तर नंतर प्रेरणा मित्र मंडळाच्या महिलांनी तेथे काठी लाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. या महिलांनी स्वतः काठी फिरवत आलेल्या आंदोलकांना लाठीकाठी चे प्रशिक्षण देऊ वेळ पडल्यास लाठी काठी घेऊन आंदोलन करू अशी इच्छा याप्रसंगी या महिलांनी व्यक्त केली. त्या नंतर काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तपोवनातील झाडांच्या अवतीभोवती बसून वनभोजनाचा आस्वाद घेतला त्यांच्याबरोबर तिथे जमलेले व काही दिवसांपासून सतत आंदोलन करणारे समाजसेवी संस्थांची पदाधिकारी व अन्य नागरिक यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव ब्रिज किशोर दत्त, सहप्रभारी श्रुती म्हात्रे, राजेंद्र बागुल, राहुल दिवे, सुभाष देवरे, वत्सलाताई खैरे, लक्ष्मण धोत्रे, उल्हास सातभाई, संदीप शर्मा, स्वप्निल पाटील, अल्तमश शेख, स्वाती जाधव, बाळासाहेब कासार, उद्धव पवार, बबलू खैरे, विजय पाटील, किरण जाधव, भालचंद्र पाटील, कुसुम चव्हाण, , आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV