अकोट : शेत रस्ता मोकळा करण्याचे आदेश
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत पिकलवाही येथील शेतकरी पुरुषोत्तम मोडक यांना न्याय मिळवून दिला आहे.अनेक वर्षांपासून मोडक यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता शेजारील शेतकऱ्याने अडविल्यामुळे त्यांन
प


अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत पिकलवाही येथील शेतकरी पुरुषोत्तम मोडक यांना न्याय मिळवून दिला आहे.अनेक वर्षांपासून मोडक यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता शेजारील शेतकऱ्याने अडविल्यामुळे त्यांना योग्यवेळेस शेतीकाम करणे अशक्य झाले होते.शेत सर्व्हे क्रमांक 167, 169 आणि 170 मधील हा शेत रस्ता मोकळा करण्यासाठी मोडक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती ,त्यानंतर त्यांनी अकोट न्यायालयाची धाव घेतली. सर्व पुरावे तपासून न्यायालयाने मोडक यांच्या बाजूने निकाल देत महसूल विभागाला तातडीने रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले.या आदेशानुसार महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात संबंधित शेत रस्ता मोकळा करून दिला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोडक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा शेतातील नियमित कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande