
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनात, अकोला पश्चिम चे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखेडे महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी अनिल मालगे यांचा काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी काँग्रेसची दुपट्टा घालून अनिल मालगे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला
यावेळी महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव, आदी मान्यवर उपस्थित होते अनिल मालगे यांनी मागील 24 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध पदे भुषविले असून त्यांनी सेवादल महानगर अध्यक्ष, प्रदेश संघटन सचिव ,ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष आता जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावरती कार्यरत होते अनिल मालगे यांची कार्यपद्धती यामुळे पक्षाला नक्कीच सामाजिक दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या अनिल मालगे यांचा पक्षाला जुने शहरात फायदाच होईल तसेच अनिल मालगे यांची असलेली पक्षनिष्ठा बघता अनिल मालगे यांचा पक्षाला फायदाच होईल
असे मत प्रकाश तायडे यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे