अकोल्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन शनिवार १३ डिसेंबर रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १० :३०
कोर्ट लोगो


अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन शनिवार १३ डिसेंबर रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १० :३० ते संध्याकाळी ५:३० दरम्यान करण्यात येणार आहे .न्यायालयात प्रलंबीत असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या लोक अदालतीमध्ये दावा निकाली काढता येणार आहे.यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे,बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे,कामगारांचे वाद,विद्युत आणि पाणी देयक बदलने प्रकरणे, (आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे वगळून)फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर दिवाणी वाद),आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे,धनादेश अनादर प्रकरणेबँकेचे कर्ज वसूली प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,वैवाहिक वाद

कामगारांचे वाद,भुसंपादन प्रकरणे,सेवा विषयक पगार, भत्ते व सेवा निवृत्तीचे फायदेविषयक प्रकरणे,इतर दिवाणी प्रकरणे (भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद इत्यादी प्रकरनाचा निपटारा करण्यात येणार आहे.

तरी उपरोक्त फायदे विचारात घेता ज्या पक्षकारांची न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा न्यायालयात दाखल व्हावयाची आहेत (दाखलपूर्व प्रकरणे) त्याना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला तर्फे आवाहन करण्यात येते आहे की, त्यांनी आपली प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणे सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. कचरे व सचिव आर. एन. बंसल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande