बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावरून आमदार सावरकर आक्रमक!
नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.)।नागपूर स्थित सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यातील दिव्यांगनबाबतचे बनावट प्रमाणपत्रांमुळे निर्माण झालेली स्थिती तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता वस्तीगृहांची आवश्यकता यासोबतच तरुणांनासह विद्
प


नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.)।नागपूर स्थित सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यातील दिव्यांगनबाबतचे बनावट प्रमाणपत्रांमुळे निर्माण झालेली स्थिती तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता वस्तीगृहांची आवश्यकता यासोबतच तरुणांनासह विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्याला विळखा घालणारी गुटखा संस्कृती प्रतिबंधित करावी, अशा तीन विषयावर आज तारांकित प्रश्न उपस्थित केले.

प्रश्न क्रमांक १६७७५ द्वारे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण व बदली प्रक्रियेत अनियमितते बाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्यानुसार सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाचि व त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर दिव्यांग संशयास्पद आढळून आल्याचे निदर्शनास आले तसेच दिव्यांग प्रमाण पात्रांच्या आधारे बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे आढळली असून दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. या बाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही करण्यात आली. यावर ख-या दिव्यांगावरील अन्याय कसा दूर करणार याबाबत आमदार सावरकरांनी प्रश्न उपस्थित केला असता दिव्यांग कल्याणमंत्री अतुल सावे यांनी आपल्या उत्तरात सांगितले की प्रत्येक जिल्ह्यातून ३ महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून ८ जानेवारी २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्या बाबत सूचना दिल्या असल्याचे मंत्री माहोदायांनी आपले उत्तरात सांगितले. तसेच तारांकित

प्रश्न क्रमांक १७२५५ द्वारा अकोला पूर्वचे आमदार श्री रणधीर सावरकर यांनी राज्यातील इतर मागास वर्गीयान समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. संबंधित विभागाचे मंत्री मा. अतुल सावे यांनी आपल्या उत्तरात सांगितले की इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्याबाबतचा निर्णय शासनाने या पूर्वीच घेतला असून राज्याचे महसूल मंत्री यांनी सदर बाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना ओनलाइन बैठकी द्वारे सुचना दिल्या असून वसतिगृहासाठी जागा प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे शाळा कॉलेज शैक्षणिक संस्थांच्या परिसराच्या जवळच छोट्या-मोठ्या दुकानातून पांढऱ्या मधून जी गुटखा विक्री होते तिला तातडीने प्रतिबंध करावा अशा आशयाचा तारांकित

प्रश्न क्रमांक १५६३६ द्वारे विषय उपस्थित करतांना आमदार रणधीर सावरकरांनी राज्यात गुटखा बंदी असल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा व अमली पदार्थांची विक्री सुरु असल्याचा उपस्थित केला. राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी सदर बाब अंशतः खरी असल्याचे आपल्या उत्तरात स्पष्ट करीत सदर गुटखा विक्रीस मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी संबंधित जिल्ह्यात गुटखा विक्री करण्यांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यात एकूण ३५ प्रकरणे आढळली आहेत. एकूण १०५०००००/- कोटीचे वाहने जप्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा महाविद्यालयांचे १०० मिटर परिसरातील टपऱ्या, किराणा दुकाने स्टोर्स यांचे अतिक्रमण काढण्या करिता स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका यांना अत्तीक्रमण हटवून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून या बाबत फेसबुक, ट्विटर आदी सोशल मिडिया द्वारे प्रसिद्धी देण्यात येत असल्याचे त्यांनी आपले उत्तरात सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande