अकोला : आरोग्य विभागात आणखी एका घोटाळ्याचा आरोप !
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)।अकोल्यातील आरोग्य विभागाच्या 2024 च्या सरळसेवा भरतीत घोटाळ्यात आणखी नवीन आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी लगावले आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कोणतेही अधिकार नस
प


अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)।अकोल्यातील आरोग्य विभागाच्या 2024 च्या सरळसेवा भरतीत घोटाळ्यात आणखी नवीन आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी लगावले आहेत.

अकोला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कोणतेही अधिकार नसताना एनएचेएम च्या 5 अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या बदली केल्याचा आरोप फैजान मिर्जा यांनी लगावला आहे.शासनाने बदलीवर बंदी घातली असताना आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी या बदल्या केल्याचा आरोप मिर्जा यांनी केला आहे.अधिकाऱ्यानं विरुद्ध तक्रारी असल्याचा कारण देत खोटा अहवाल सादर करून बदली करण्यात आली असून सदर केलेल्या अहवालात एकाच व्यक्तीने सुमारे 20 जन्माच्या स्वाक्षरी केल्याचा ही गंभीर आरोप लगावण्यात आला आहे असे पुरावे सुद्धा मिर्जा सादर केले आहे.आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर केलेल्या अहवालातील स्वाक्षरींची फॉरेन्सिक चाचणी करावी ,स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींनीच या स्वाक्षरी केल्या आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी मिर्जा यांनी केली आहे.अधिवेशन सुरू असून या गंभीर प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची विनंती मिर्जा यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande