अकोला : गोपाल दातकरांवर पाणीचोरीचा गुन्हा
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना उबाठाचे अकोला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गोपाल दातकर यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिसात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपयाचे पाणी
प


अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना उबाठाचे अकोला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गोपाल दातकर यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिसात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपयाचे पाणी चोरले असल्याचा आरोप त्यांच्या हिंगणी गावातील सरपंच कल्पना पळसपगार यांनी केला होता. दातकर यांनी पाण्याची लाईन सुरु करुन स्वतःच्या शेतात आणि घरात पाण्याचा वापर केला असल्याचं आरोप होता.या अवैध पाणीचोरी बाबत सरपंच यांनी न्यायालयात दाद मागितली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने गोपाल दातकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.मात्र गोपाल दातकर यांनी सुद्धा आता एका पत्राद्वारे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात वस्तुस्थिती नुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.तर गावाला नियमीत पाणी मिळत नसल्याने पाईपलाईन वर माझे घराजवळ कोणी कनेक्शन उभे केले व त्यावरून पाणी पुरवठा केला याबाबत मजिप्रा कडुन माहिती घेऊन योग्य तो तपास करावा आणि जर सदर कनेक्शन मजिप्रा ने केले असेल तर ते अवैध कसे व पाणी चोरी कशी केली याची सखोल चौकशी करावी अशी ही मागणी दातकर यांनी केली आहे.फिर्यादीने जाणिवपूर्वक खोटी तक्रार दिली असून तक्रारी नुसार सखोल चौकशी करावी व सत्यपरिस्थिती समोर आणावी आणि जर माझे चुकीचे असेल तर आपण कायदेशिर माझेविरूध्द कारवाई करावी आणि जर तक्रार चुकिची असेल तर फिर्यादीने खोटी तक्रार केली म्हणुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी दातकर यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande