अकोला येथे “नंद तारांगण” केंद्राचे उद्घाटन
अत्याधुनिक दुर्बीणींद्वारे आकाशातील अद्भुत रहस्यांचे दर्शन.. अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथे प्रदीप नंद यांच्या पुढाकारातून “नंद तारांगण” या अत्याधुनिक खगोल अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा व
P


अत्याधुनिक दुर्बीणींद्वारे आकाशातील अद्भुत रहस्यांचे दर्शन..

अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथे प्रदीप नंद यांच्या पुढाकारातून “नंद तारांगण” या अत्याधुनिक खगोल अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेले हे केंद्र विदर्भातील एकमेव असे खगोल निरीक्षण केंद्र ठरणार आहे.या केंद्रात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तीन दुर्बिणींमुळे खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना अंतराळातील विस्मयकारक दृश्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्रावरील विवर, दऱ्याखोऱ्या, विविध ग्रह-उपग्रह, तसेच गुरू ग्रहावरील सुरू असलेली महाकाय वादळे आणि त्याचे अक्षाभोवतीचे परिवलन यांसारख्या घटनांचे थेट निरीक्षण पाहता येणार आहे.

याशिवाय, हॉर्स हेड नेब्युला, अँड्रोमेडा गॅलॅक्सी, कॅब नेब्युला यांसारखी अतिदूर असलेली आकर्षक आकाशगंगा आणि नेब्युलाची दृश्येसुद्धा येथे पाहण्याची संधी उपलब्ध आहे. या दुर्बिणींमधून गुणवत्ता असलेली खगोल फोटोग्राफी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.“नंद तारांगण” केंद्रामुळे अकोल्यातील नागरिकांना आणि परिसरातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि अंतराळाचा अनोखा चमत्कार अनुभवण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande