
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)। केंद्र सरकारच्या अल्पसंख्यक मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘उम्मीद’ पोर्टलवर अकोला जिल्ह्याने वक्फ मालमत्तांच्या नोंदणीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. निश्चित मुदत पूर्वीच अकोला जिल्ह्यातील सर्व वक्फ मालमत्तांची १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एकूण १२३५ मालमत्ता अपलोड, ६०८ मालमत्ता पडताळणी (व्हेरिफाय) करण्यात आल्या असून २१६ मालमत्तांना मंजुरी देण्यात आली आहे. या यशामध्ये जिल्हा वक्फ अधिकारी शेख इब्राहीम मुर्तुजा (अकोला–वाशिम) यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच कनिष्ठ सहाय्यक आकिब अहमद खान आणि सय्यद मुजम्मिल अली यांनीही प्रभावी भूमिका बजावली. नोंदणी मोहिम यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. रोटी बँकच्या वतीने डॉ. झुबेर नदीम, डॉ. मुजाहिद, मोहसिन सर, रियाझ अहमद खान, राहिल अफसर आणि मोहम्मद सामी यांनी विविध ठिकाणी जनजागृती शिबिरे घेऊन वक्फ संस्थांना मार्गदर्शन केले. तसेच कच्छी मेमन जमात, अकोलाचे अध्यक्ष जावेद झकरिया आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डशी संबंधित मुफ्ती अशफाक कासमी यांनीही संस्थांना वेळेत नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत महत्त्वाचे सहकार्य केले. अकोला जिल्ह्याचे हे यश प्रशासन आणि समाज यांच्यातील उत्तम समन्वयाचे उदाहरण मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे