हिवाळी अधिवेशनात अंबादास दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बने खळबळ
* सत्ताधारी आमदाराचा नोटांची बंडलं मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल नागपूर / छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय
व्हिडिओ


* सत्ताधारी आमदाराचा नोटांची बंडलं मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर / छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे , हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!

जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे , हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?

याबाबत अंबादास दानवे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्या त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande