अमरावती : केंद्रीय विभागाकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणी
अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणी केली. तमिळनाडू येथील डॉ. समांथ्वा सेलवन चेंगलपट्टू यांनी दोन ही पाहणी
केंद्रीय कुष्ठरोग विभागाकडून  कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणी


अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणी केली. तमिळनाडू येथील डॉ. समांथ्वा सेलवन चेंगलपट्टू यांनी दोन ही पाहणी केली.

सदर अभ्यास दौरामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सर्वंकष पाहणी करण्यात आली. डॉ. समांथ्वा सेलवन चेंगलपट्टू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांची भेट घेऊन त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग नियोजन कार्यक्रमाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नवीन कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार सुरू केल्यास येत्या काही वर्षांमध्ये कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करण्यात यश मिळणार असल्याचे सांगितले. सदर दौऱ्यात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर, अमरावती महानगरपालिका अंतर्गत दस्तूरनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तपोवन येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

यावेळी सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. पूनम मोहोकार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, अवैद्यकीय सहाय्यक रमेश सोनार, कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश ठाकरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande