
परभणी, 9 डिसेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्याम राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने आयोजित केलेल्या मसाले उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमाला परभणी येथे नुकताच प्रारंभ झाला. हे अनिवासी प्रशिक्षण एक महिना कालावधीसाठी असून, अमृत लघुउद्योजक स्वयंरोजगार प्रोत्साहन आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यावेळी अमृत संस्थेचे पदाधिकारी, एमसीईडीचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. जावळीकर, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा समन्वयक फुलचंद यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis